भारतीय तिरंगा ध्वजाला एक ध्वज संहिता निश्चित केली गेली आहे. या ध्वज संहितेनुसार शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार होणे आवश्यक असते. शासकीय ध्वज हा तीन फूट बाय चार फूट आकाराचा असावा, असा नियम आहे. मात्र, ही ध्वज संहिता माहिती नसल्याने काही ठिकाणी ध्वज संहितेचे पालन होत नव्हते. या संदर्भात अहिल्यानगरमधील शिक्षक शाहजहान शेख यांनी प्रशासनाच्या चूक निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता ध्वज संहितेनुसार शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार होत आहेत.