साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे दिलीप वलथरे हा अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळताना आढळला त्याच्याकडून 35 लिटर हातभट्टीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली असून या दारूची किंमत 7000 रुपये आहे त्याच्यावर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सोमवार दिनांक 29 डिसेंबरला पहाटे सहा वाजता साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे