राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा बाजारपेठेत उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या जागेची पाहणी केली. हे शिवस्मारक सनटेक इंजिनियर अँड कन्सल्टंट्स, बदलापूर मार्फत उभारले जाणार असून त्याची डिझाईन आणि वास्तुरचना तज्ञ समर्थ झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जाणार आहे. पाहणी दरम्यान खासदार तटकरे यांनी शासकीय विश्रामगृहात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा डेमोही पाहिला.