भिष्णूर गावातील अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी जलालखेडा पोलीस आणि ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या 'दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार' या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने गतीने हालचाली सुरू केल्या आहेत.गावात पूर्णपणे दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्यासाठी भिष्णूरच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत अधिकृतरीत्या दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे.