येरंडी व बुधेवाडा येथे मराठी नाटक व तमाशा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. या दोन्ही गावांमध्ये पारंपरिक कलेला साजेशा असा उत्साह आणि गर्दी होती. मराठी मातीची ही जीवंत कला, लोकनाट्य आणि तमाशा ही आपली सांस्कृतिक ओळख आहे. अशा कार्यक्रमांमुळे गावागावांतून ही परंपरा जिवंत राहते आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचते. असे याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले.