नांदुरा: लाचखोर पुरवठा निरीक्षकास न्यायालयाने सुनावली दोन दिवसाची पोलिस कोठडी
) स्वस्त धान्य दुकानदाराकडून सोळा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तहसीलच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांच्या केबीनमध्येच १४ नोव्हेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने छापा मारला. रंगेहाथ पकडलेल्या पूनम थोरात यांना गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली.१५ नोव्हें.न्यायालय हजर केले असता आरोपीस सोमवारपर्यंत दोन दिवसांचा पीसीआर देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी दिली.