पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूकविषयक कर्तव्यासाठी हजर न राहिल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी तत्काळ प्रभावाने निलंबनाचे आदेश बजावले आहेत.