कन्नड: हर्षवर्धन जाधवांचा मोठा राजकीय निर्णय; चिंचोली–नाचनवेल गटातून गजानन गवळी यांना उमेदवारी जाहीर
कन्नड तालुक्याचे भाग्यविधाते तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि २० जानेवारी रोजी दु २ वाजता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कन्नड तालुक्यातील चिंचोली व नाचनवेल जिल्हा परिषद गटातून गजानन गवळी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.या निर्णयामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.गजानन गवळी हे स्थानिक पातळीवर सक्रिय असून विकासकामांसाठी ओळखले जातात.हर्षवर्धन दादा जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.