बुलढाणा: जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, ॲड.जयश्री शेळके यांनी केली पीक नुकसानीची पाहणी
बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील रिधोरा,गुगळी,लपाली, सिंदखेड,पिंपळगाव देवी, लिहा,आव्हा आणि कोल्ही गवळी या गावांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आज शिवसेना उबाठा प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी या गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली.