माण: माण तालुक्यातील राणंदच्या तलावात अवतरली कृष्णामाई; जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेतून मिळाले पाणी
Man, Satara | May 8, 2025 माण तालुक्यातून दुष्काळ हा शब्द कायमचा हद्दपार करण्याचा ठाम निर्धार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कठापूर कटापूर उपसा जलसिंचन योजनेतून कृष्णा नदीचे पाणी आता थेट दुष्काळी माण तालुक्यातील राणंदच्या तलावात पोहोचले आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत जलपूजन केले. मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातून दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.