जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. शनिवार दि.3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे आयोजित या प्रशिक्षणास एकूण 1855 पैकी 1820 अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले. प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या 35 अधिकारी व कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.