सेलू शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणावर शुक्रवारी (दि. २ जानेवारी) सकाळी १०.३० च्या सुमारास नगरपंचायत प्रशासनाने गजराज चालवला. मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली बुलडोझरचा गडगडाट सुरू झाला आणि काही ठिकाणी अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. परंतु काही प्रभावशाली व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढताना प्रशासनाने घुटणे टेकले. परिणामी कारवाई अर्ध्यावरच थांबविण्यात आल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.