आज दिनांक नऊ डिसेंबरला तीन वाजता चे दरम्यान पाळा मार्गावरील रेल्वे स्टेशन जवळ मोर्शी शहरातील मोहम्मद शरीफ नावाची इसम रस्त्यावर पडलेल्या स्थितीत आढळून आल्याने, या मार्गावरून जाणाऱ्या कुण्या तरी व्यक्तीने तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेला याबाबतीत माहिती दिली. तानाजी युवा बहुउद्देशीय संस्था व रवी भाऊ मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून गंभीर स्थितीत असलेल्या इसमाला, स्वतःचे वाहनाने उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे उपचाराकरिता दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे