लातूर: १८००० विद्यार्थ्यांनी केले सामूहिक गीता पठण
Latur, Latur | Dec 1, 2025 गीता जयंतीच्या निमित्ताने भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर, उदगीर, अंबाजोगाई, माजलगाव, बीड व पैठण येथील शैक्षणिक संकुलातील सुमारे १८००० विद्यार्थ्यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या १२ व्या व १५ व्या अध्यायाचे पठण केले. या सहाही संकुलातील विद्यार्थी थेट प्रक्षेपणाद्वारे आभासी पद्धतीने जोडले गेले व सकाळी आठ वाजता एकत्रितपणे गीतेच्या १२ व्या व १५ व्या अध्यायाचे पठण केले गेले.