दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीचा राजकीय गड भाजप महायुतीने उध्वस्त केला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीमध्ये शेकापला 0 जागा मिळाली आहे. पनवेल तालुक्यातील ८ पैकी ८ जिल्हा परिषदेच्या जागा तर पनवेल पंचायत समितीच्या १६ पैकी १५ जागांवर विजय मिळवत शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.