नेवासा: विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयत शिवानी बाळासाहेब कुसळकर रा. सोनई हिस तिच्या सासरच्या मंडळींनी पोकलेंड घेण्यासाठी माहेरून 3 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. आई सुवर्णाबाई राजाराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.