वर्धा जिल्ह्यातील जयपूर येथे कबड्डीचा थरार पाहायला मिळाला,जिथे मॉ राणूमाता स्पोर्टिंग क्लब,रोठा संघाने भव्य कबड्डी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले श्री शंभू भारती महाराज व वैष्णोराणी स्पोर्टिंग क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेत संपूर्ण विभागातून ४७संघांनी आपला कसब दाखवला.अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रोठा संघाने प्रथम क्रमांक पटकावत २१ हजार १ रुपये व चषक पटकावले असल्याचे आज 17 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे