इंदापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर शहरात वकील डॉक्टर आणि व्यापाऱ्यांशी साधणार संवाद
Indapur, Pune | Apr 16, 2024 उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी 17 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत.सकाळी आठ वाजताच्या सुमारास अजित पवार हे इंदापूर शहरातील डाॅ. नीतू मांडगे सभागृहात डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर इंदापूर शहरातील वाघ पॅलेस या ठिकाणी अजित पवार शहरातील व्यापारी आणि वकील मंडळींशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून मंगळवारी 16 एप्रिल रोजी रात्री प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलीय.