बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाच्या पोखरवाडा शिवारात बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तात्काळ पिंजरे लावणे, ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवणे व रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली. वनविभागाने दक्षता घेण्याचे आवाहन करत अफवा न पसरवता सूचनांचे पालन करण्याचे सांगितले