घाटंजी: विद्यार्थ्याकडून मसाज करून घेणाऱ्या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस,तालुक्यातील एका शाळेत घडला होता प्रकार
शाळेत मध्य धुंद अवस्थेत येऊन विद्यार्थ्याकडून मसाज करून घेण्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये घडला होता.याप्रकरणी घाटंजी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रज्ञा पाटील यांनी त्या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस दिली.