रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत भ्रष्टाचाराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आरोपी राजेश राम जाधव, कनिष्ठ श्रेणी लिपीक, यांनी सन 2021 पासून चाललेल्या त्यांच्या नेमणुकीत शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार केला असल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची रक्कम एकूण अंदाजे 1 कोटी 78 लाख 29 हजार 300 रुपये आहे. ज्यामध्ये आरोपी यांची पत्नी रिया राजेश जाधव देखील सामील असल्याचं फिर्यादीत नमूद आहे.