गोंदिया: पार्वती घाटाचे मोक्षधाम नामकरण, मोक्षधाम येथे सफाई अभियान, सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन....
विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या वतीने संचालित सर्व समाज मोक्षदाम समिती गोंदिया च्या वतीने आज स्मशान घाटाचे मोक्षधाम नामांतरण करण्यात आले तसेच सफाई अभियान सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या सेवा कार्याला 501 आठवडे पूर्ण झाले. आज दोनशेच्या जवळ सदस्य उपस्थित होते. त्यानिमित्त वार्षिक स्नेह मिलन वृक्षारोपण व सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.