आज दिनांक 13 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळाल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे गाव शिवारात असलेल्या मोबाईल कंपनीच्या टावर मधील वीस बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने 12 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सोडून दिले असून यात एकूण 20 हजार रुपयांच्या बॅटरी या चोरट्याने चोरून नेल्या ,याप्रकरणी जनार्दन त्रिंबकराव कणखर यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.