इंदापूर: कांदलगावमध्ये घरफोडी,पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्या विरोधात इंदापूर पोलीसात गुन्हा दाखल
Indapur, Pune | Apr 14, 2024 कांदलगाव मध्ये अज्ञात चोरट्याने घरपोडी करत लाखो रुपयांच्या ऐवजावरती डल्ला मारलाय.रविवारी दि.14 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली असून या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात समाधान दत्तू सरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात कलम 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम मिळून तब्बल पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. इंदापूर पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.