औसा येथे झालेल्या कार व ऑटोरिक्षाच्या अपघातात तीन जणांचा शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहिले. तसेच ऑटोरिक्षा व कारमध्ये झालेल्या अपघाताची माहिती जाणून घेतली.