भूम: भूम पंचायत समिती कर्मचाऱ्यावर हल्ला करणारे पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दि. 09 सप्टेंबर 2025 रोजी ईट–जातेगाव रस्त्यावर पंचायत समिती कर्मचारी श्रीकृष्ण बांगर व त्यांच्या सहकाऱ्यावर चार अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सलमान पठाण (रा. भूम) व रितेश अंधारे (रा. हाडोंगरी) यांना येरमाळा येथे ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पैशाच्या मोबदल्यात हल्ला केल्याची कबुली दिली.