"मी विष घेतले आहे," हे शब्द फोनवर उच्चारत गडेगाव येथील ३० वर्षीय तरुणाने आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना भावाला दिली आणि काही तासांतच त्याची प्राणज्योत मालवली. सुरज देवचंद निबांर्ते असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे लाखनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास सुरजने आपला भाऊ अविनाश बाहेर असताना त्याला फोन करून ही धक्कादायक माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने धाव घेऊन त्याला स्मशानभूमी परिसरातून उचलले.