जालना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोड परिसरात तरुण चरण रायमल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कदीम जालना पोलिसांनी नूतन वसाहत परिसरात धिंड काढली. तसेच आरोपींना घटनास्थळी नेऊन कृती पंचनामा व घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी जालना शहरातील नूतन वसाहत भागात भरवस्तीत दोघा आरोपींनी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून चरण रायमल यांची निर्घृण हत्या केली होती.