चाळीसगाव: मका, कांदा आणि कडधान्य खरेदी करून त्याचे पैसे न देता चाळीसगाव येथील एका प्रक्रिया उद्योगाची तब्बल ३० लाख ५५ हजार ४८० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खामगाव (जि. बुलढाणा) येथील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.