आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन नगर परिषद निवडणूक निकाल जाहीर झाला आहे, यात शरद पवार राष्ट्रवादी गट मा.आ.चंद्रकांत पाटील दानवे यांचे कट्टर समर्थक शमीम मिरझा यांच्या सूनबाई व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समरीन मिरझा भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत, तर त्यांच्या पक्षाचे ईतर 9 नगर सेवक सुद्धा विजयी झाले आहे, त्या मुळे कार्यर्कत्यांनी फटाके फोडत गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला आहे.