फिर्यादी सोनाली पंडित यांच्या तक्रारीनुसार 27 डिसेंबर ते 28 डिसेंबर च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि हॉलमधील 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी 28 डिसेंबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वसंत नगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.