निफाड: लासलगावला सोन्याची पोत चोरून नेणाऱ्या महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पत्रकार पारीक यांची सतर्कता
Niphad, Nashik | Aug 6, 2025 लासलगाव शहरातील सुकेनकर चाळीमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या दोन महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या असून घटना घडल्यानंतर पत्रकार उमेश पारिख यांनी त्वरित या महिलांचा पाठलाग करत पोलिसांच्या मदतीने या एका महिलेने ताब्यात घेण्यात यश आले आहे. सदरची घटना दि. ५ सायंकाळी दु. 3 वाजेच्या घडली असल्याची माहिती लासलगाव पोलिसांनी आज दिनांक सहा रोजी सायंकाळी पाच वाजता दिली. दरम्यान पत्रकार पारीक यांच्या सतर्कतेचे लासलगाव शहरात कौतुक व्यक्त केले जात आहे.