पेठ बीड हद्दीत पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धाड,05 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त, 08 जण घेतले ताब्यात
बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत होत असताना देखील स्थानिक पोलिसांकडून यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत