आज दि 16 जानेवारी दुपारी 3 वाजता सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी आम्ही ठामपणे सांगितले होते की महापौर भारतीय जनता पार्टीचाच असेल, आणि जनतेने तो विश्वास सार्थ ठरवला, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांचे प्रश्न, कचरा व्यवस्थापन आणि पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यात आला आहे. येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक, पर्यटन आणि शिक्षणाचे हब म्हणून विकसित