छत्रपती संभाजीनगर : शहरातील मध्यभागी असलेल्या नागेश्वर वाडी भागामध्ये रात्रीच्या वेळी तरुण तरुणीला बळजबरी करत असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी कुठलीच तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नसल्याने या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.