मोताळा: पुन्हई येथील शेतकरीपुत्राची विष प्राशन करुन आत्महत्या
मोताळा तालुक्यातील पुन्हई येथील २४ वर्षीय शेतकरीपुत्राने विषारी औषध प्राशन केले होते. नातेवाईकांनी त्याला उपचारार्थ बुलढाणा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा २० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मृतक युवकाचे नाव सुबोध धुरंधर असे आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.