चाळीसगाव (प्रतिनिधी): देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय सेनेतील (BSF) १५ बटालियनचे जवान आणि वडाळा गावचे सुपुत्र मुकेश तुळशीराम सूर्यवंशी (पाटील) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी माजी सैनिक गोकुळ प्रल्हाद पाटील खेरडेकर यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.