आज गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की आज शहरातील लालमाती मातंगवस्ती, वाकळेवस्ती, पानमळा आणि भद्रा कॉलनी या परिसरात उत्साहपूर्ण कॉर्नर बैठका घेण्यात आल्या, तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांची अपेक्षा, अडचणी आणि विकासाच्या गरजांवर चर्चा करण्यात आली. प्रचार दौऱ्यादरम्यान सहकारी मित्र जितु काळे, दिनेश तुपे, बाबासाहेब फुलारे, रामनाथ बारगळ, कारभारी ढवळे आणि धनाजी नागे यांच्या निवासस्थानी भेट दिली.