नेर: धनज येथे एकाच्या घरी निघाला साप,सर्पमित्राने दिले जीवनदान
Ner, Yavatmal | Dec 2, 2025 धनज येथे शेख सर यांच्या घरी साप निघाला असता त्यांनी ताबडतोब माणिकवाडा येथील सर्पमित्र अक्षय ढोमने याला मोबाईल वरून माहिती दिली. यावेळी सर्पमित्र अक्षय याने क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब शेख सर यांच्या घरी जाऊन सापाला अतिशय शिताफीने पकडून बॉटलमध्ये जेरबंद करून जंगलात सोडले. सदर साप हा रूपसुंदरी जातीचा असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.