(प्रतिनिधी): चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला न बांधले जाता स्वबळावर विजय मिळवणाऱ्या दोन दिग्गज अपक्ष नगरसेवकांनी आज आपली शक्ती एकत्र केली आहे. माजी आरोग्य सभापती सौ. सायलीताई रोशन जाधव आणि अनुभवी नगरसेवक मा. राजेंद्र रामदास चौधरी यांनी 'स्वतंत्र गट' स्थापन करून स्थानिक राजकारणात एका नव्या समीकरणाची नांदी दिली आहे.