वाशी: तालुक्यातील एका गावात तरुणीवर अत्याचार, पोलिस ठाणे वाशी येथे गुन्हा दाखल m
वाशी पोलीस ठाणे : तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणीला गावातीलच चौघा तरुणांनी 14 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता ते 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान जबरदस्तीने चारचाकी वाहनात नेले. त्यातील एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान इतर तिघा तरुणांनी ही घटना कोणाला सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली.