चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे बेकायदेशीररित्या गोवंश मांसाची विक्री व साठवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी रविवारी (दि. ४ जानेवारी) केलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर हाडे, चरबी आणि मांस जप्त केले असून याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.