यवतमाळ: ‘विघ्नवाट’ लघुपटाला ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये प्रक्षेपित करण्याची परवानगी द्या ; प्रतिभा फाउंडेशनची मागणी
आदिवासी बहुल व शेतकरी आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ‘विघ्नवाट या लघुपटाला संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत प्रक्षेपित करण्यासाठीं परवानगी द्या.अशी मागणी प्रतिभा फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच एका निवेदना द्वारे केली आहे.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी विकास मिना यांचेकडे देण्यात आले.