जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. गुरुवार दि. 29 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वा मिळालेल्या माहितीनुसार कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर चाकू हल्ला करणार्यांना सदरबाजार पोलीसांनी जेरबंद केले.आरोपींनी संगनमत करून गोपालपुरा जालना येथील रहिवासी बळीराम इंगळे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने पोटात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती.गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते.