साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेमध्ये शुक्रवार दि16 जानेवारीला नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदासाठी व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी गुरुवार दि.15 जानेवारीला दुपारी तीन वाजता दिली आहे. यासाठी भाजपकडून व काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे परंतु भाजपकडे बहुमत असल्याने भाजपचाच उपाध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात आहे उपाध्यक्ष पदासाठी रोहिणी मुंगूलमारे राजू पोगळे पंकज मुंगुलमारे हे नावे चर्चेत आहेत