वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार संगमनेर : शहराजवळील सुकेवाडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री रात्री घडली. संगमनेर-कुरण रस्त्यावरील दत्तवाडी शिवारात भक्ष्याच्या शोधात रस्ता ओलांडताना बिबट्या अज्ञात वाहनाखाली आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात बिबट्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला कळवले होते.