भातकुली : स्थानिक आसरा रोडवरील विमल वाईन शॉप हे देशी दारूचे दुकान फोडण्यात आले. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी तो प्रकार उघड झाला. अज्ञात आरोपीने त्या दुकानातील काउंटरमधील ३८ हजार ४०० रुपये रोख व देशी दारू असा एकुण १ लाख २४ हजार ३८० रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. वाईन शॉपच्या शटरचे लॉक तोडून ती चोरी करण्यात आली. या प्रकरणी दुकानमालक आशिष बबनराव मोहोड यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.