तालुका जालना पोलिसांनी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 18 किलो गांजा जप्त केला आहे. सोमवार दि. 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे नऊ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे जालना शहरात गांजाच्या तस्करीविरोधात पोलीस यंत्रणेने घेतलेल्या धडक कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही माहिती पोलीसांनी माध्यमांपासून दडविल्याने पुन्हा उलट चर्चा देखील सुरु आहे.