तालुक्यातील मौजा कोपरा येथे संत फक्कडनाथ महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव आज, शुक्रवार (ता. ९) रोजी सकाळी ११ वाजता भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हरिनामाच्या गजरात आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात भागवत कथेच्या मधुर स्वरांनी परिसर दुमदुमला होता.