पैठण शहरातील विनापरवाना लावण्यात आलेले डिजिटल बोर्ड निवडणूक विभागाने काढून जप्त केले आहे गेल्या दोन दिवसापासून डिजिटल बोर्ड काढून घेण्यासंदर्भात निवडणूक विभागाने विविध पक्षांना डिजिटल बोर्ड लावणाऱ्यास काढून घेण्याचे आदेश दिले होते मात्र सूचना देऊनही बोर्ड जसे थे ठेवण्यात आल्याने 27 नोव्हेंबर गुरुवार रोजी बोर्ड जप्त करण्यात आले यानंतर सार्वजनिक ठिकाणी डिजिटल बोर्ड लावल्यास गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे